पोह्याचा चिवडा | Pohyacha Chivda
पोह्याचा चिवडा | Pohyacha Chivda
साहित्य –
- १ किलो पात्तळ पोहे,
- ½ कप तेल,
- १ कप सुक्या खोबऱ्याचे काप,
- १ कप कच्चे शेंगदाणे,
- ¼ कप चण्याच्या डाळ्या,
- ¼ कप काजू काप,
- ¼ कप किशमिश,
- १½ tblsp जीरे,
- ४ tblsp धणे,
- २ tblsp बडीशेप,
- ८/९ बारीक चिरलेल्या मिरच्या,
- ३०/४० कडीपत्ता,
- ½ tspn हिंग,
- ½ कप साखर,
- २ tblsp खसखस,
- १½ tblsp हळद,
- आणि चवीनुसार मीठ.
कृती –
प्रथम पोहे २ ते ३ दिवस उन्हात वाळवून घ्यावे. वाळवून
झाल्यानंतर त्यांना चाळणीतून काढावे. आता एका कढईत कुरकुरीत भाजून घ्यावे.
आता ६ tbl spn तेल कढईत घालून तापवावे आणि
त्यात कच्चे शेंगदाणे, सुक्या खोबऱ्याचे काप, काजू काप, चण्याच्या डाळ्या सोनेरी रंगावर तळून
घ्यावं.
आता कढईत उरलेले तेल घालून चांगलं गरम करून घ्यावं आणि त्यात
जिरे,
धणे, बडीशेप, चिरलेल्या
मिरच्या, कडीपत्ता, हिंग, खसखस, हळद, चवीनुसार मीठ घालून
छान परतून फोडणी तयार करावी.
आता या फोडणीत भाजलेला पात्तळ पोहा मिक्स करावा. मिक्स करून
झाल्यानंतर याला मोठ्या परातीत काढून घ्यावं आणि त्यात तळलेले काजू काप, खोबरे,
चण्याच्या डाळ्या, शेंगदाणे, साखर, किशमिश घालून चिवडा चांगला एकजीव करून घ्यावा.
एकजीव करून झाल्यावर चिवडा हवाबंद डब्ब्यात भरून घ्यावा. हा
चिवडा दिड महिनाभर
साठवू शकता.
Tag-पोह्यांचा चिवडा,पातळ पोह्यांचा चिवडा,भाजक्या पोह्याचा चिवडा,patal pohyacha chivda,chivda recipe,chivda,poha chivda,पोह्याचा चिवडा,चिवडा,patal poha chivda,pohyacha chivda,poha chivda recipe,bhajkya pohyacha chivda,chivda recipe in marathi,bhajakya pohyacha chivda,patal pohyancha chivda,jad pohyacha chivda,bhajkya pohyacha chivda recipe marathi,pohyancha chivda,तळलेल्या पोह्यांचा चिवडा,मक्याचा चिवडा,makyacha chivda,पातळ पोह्याचा चिवडा
COMMENTS