गाजराचा हलवा | Carrots halwa
गाजराचा हलवा | Carrots halwa
साहित्य
- गाजर - अर्धा किलोग्रॅम
- साखर - पाव किलोग्रॅम
- वेलची - सात ते आठ
- तूप - चार चमचे
- ड्राय फ्रुट्स - आवडीनुसार
- खवा - तीन ते चार चमचे
कृती
- प्रथम गाजर स्वच्छ धुऊन व ते खिसुन घ्यावे. वेलची कुठून पावडर तयार करून घ्यावी. ड्रायफ्रुट्स एकसमान काप तयार करून घ्यावेत.
- कढईमध्ये तूप टाकावे व त्यामध्ये ड्राय फ्रुट्स फ्राय करून बाजूला काढून घ्यावेत.
- ड्रायफ्रूट्स बाजूला काढून घेतल्यानंतर त्याच गरम झालेल्या तुपात गाजराचा खीस घालावा व तो चांगला परतून घ्यावा.
- गाजराचा रंग थोडा बदलल्यानंतर त्यात साखर घालावी. आता साखर वितळू लागेल. हे मिश्रण सतत हालवत राहावे म्हणजे कढईला चिकटणार नाही.
- पाच ते सात मिनिटांनी खवा आणि वेलचीपूड घालावी आणखी सात ते दहा मिनिटे हे मिश्रण हलवत रहावे.
- आता मिश्रणामध्ये फ्राय केलेले ड्रायफ्रुट्स घालून हे मिश्रण मंद गॅसवर दोन ते तीन मिनिटे ठेवावे.
अशा तऱ्हेने मस्त
गाजराचा हलवा तयार झालेला आहे.
******************************************
Tag-carrot halwa with jaggery,carrot halwa in cooker,carrot halwa in hindi,carrot halwa calories
carrot halwa with mawa,carrot halwa recipe,carrot halwa benefits,the carrot halwa,gajar a halwa
make a carrot halwa,carrot halwa caption,carrot halwa cooker
COMMENTS