साबुदाणा खिचडी
साबुदाणा खिचडी रेसिपी | Sabudana Khichdi Recipe खिचडी
साहित्य :-
- 1 वाटी भिजलेला साबुदाणा ( 6 ते 8 तास भिजलेला)
- अर्धी वाटी भाजून जाडसर वाटून घेतलेले शेंगदाणे
- 5 ते 6 हिरव्या मिरच्या
- 2 चमचे साजूक तूप
- एक मध्यम आकाराचा बटाटा
- चवीनुसार मीठ साखर
कृती:-
- प्रथम सहा ते आठ तास साबुदाणा भिजवून ठेवावा. भिजवताना तो दोन ते तीन वेळा व्यवस्थित धुवावा म्हणजे आपली खिचडी चिकट होणार नाही.
- बटाटा बारीक चिरून मग धुवावा म्हणजे त्यातील स्टार्च कमी होतील.
- हिरवी मिरची बारीक चिरून घ्यावी.
- प्रथम कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घ्यावे.
- तूप गरम झाल्यावर त्यात हिरवी मिरची परतुन घ्यावी. त्यातच चिरलेले बटाटे परतुन घ्यावे.
- आता यात भिजलेला साबुदाणा व शेंगदाण्याचा कूट घालावा.
- चवीनुसार मीठ व साखर घालून छान परतून घ्यावे.
- कढईवर झाकण ठेवून पाच मिनिटापर्यंत वाफवून घ्यावे, पाच मिनिटांनी पुन्हा परतून घ्यावे.
- आपली खमंग खिचडी तयार होईल.
Tag-sabudana khichdi recipe in marathi,sabudana khichdi recipe in hindi,sabudana khichdi recipe for weight loss,sabudana khichdi recipe at home,authentic sabudana khichdi recipe,aloo sabudana khichdi recipe,aalu sabudana khichdi recipe,sabudana ki khichdi recipe,sabudana khichdi recipe for fast,sabudana khichdi best recipe,sabudana khichdi recipe for baby,sabudana khichdi recipe calories,sabudana khichdi quick recipe,sabudana khichdi for dinner,sabudana, khichdi easy recipe,sabudana khichdi fast recipe,sabudana khichdi recipe for upvas,साबूदाना का खिचड़ी रेसिपी
COMMENTS