बेसन लाडू (बिना पाकातील) | Besan Laddu
बेसन लाडू (बिना पाकातील) | Besan Laddu
साहित्य :-
- दोन वाट्या बेसन चे पीठ
- दीड वाटी पिठीसाखर
- अर्धी वाटी साजूक तूप
- एक चमचा वेलची पावडर
- आवडीनुसार ड्रायफ्रूट्स
- दोन चमचे दूध
कृती :-
- एका जाड कढईमध्ये बेसन पीठ घालून प्रथम कोरडेच भाजावे.
- पाच मिनिटांनी त्यात थोडे थोडे साजूक तूप घालण्यास सुरुवात करावी. तूप एकदम सगळे घालू नये.
- पिठाचा रंग बदलेपर्यंत खरपूस भाजून घ्यावे. तूप घातल्यानंतर पीठामध्ये गाठी होण्यास सुरुवात होईल. या गाठी हलक्या हाताने फोडून घ्याव्या.
- व्यवस्थित भाजलेल्या पिठात दोन चमचे दूध घाला, गॅस बंद करा व ते मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून द्या.
- पिठ एकदम थंड झाल्यानंतर, त्यात मिक्सरमध्ये बारीक केलेली साखर मिसळा. हाताने त्यातील गाडी फोडून सर्व मिश्रण एकजीव करा.
- आता यात वेलची पावडर व काजू बदामाचे तुकडे घालून परत सर्व मिश्रण एकजीव करून घ्या.
- आवश्यक वाटल्यास एक चमचा तूप घाला व छान लाडू वळून घ्या.
आपले खमंग
बेसन लाडू तयार झाले.
Tag - बेसन लाडू,रवा बेसन लाडू,रवा लाडू,बेसन लाडू रेसिपी मराठी,बेसन लाडू रेसिपी मराठीत,बेसनाचे लाडू,बेसन लाडू रेसिपी,बेसन लाडू करण्याची पद्धत,बेसन के लड्डू,आजीचे बेसन लाडू,बेसनाचे लाडू रेसिपी,बेसन पिठाचे रवाळ लाडू,बेसन लाडू.,#रवा बेसन लाडू,हलवाई जैसे बेसन लड्डू,शेव लाडू,बेसन लडडू,बेसन रवा लाडू,दिवाळी बेसन लाडू,बेसनचे लाडू,दाणेदार बेसन लाडू,रवा लाडू बेसन लाडू,बेसन लाडू ची रेसिपी,बेसन लाडू कसे करावेत,बेसन लाडू कसे करायचे,लाडू,बेसन गुळाचे लाडू
COMMENTS