चिकन दम बिर्याणी || Chicken Dum Biryani
चिकन दम बिर्याणी || Chicken Dum Biryani
साहित्य:-
- अर्धा किलो चिकन
- अर्धा किलो बासमती दावत तांदूळ
- चार ते पाच चमचे आले-लसूण पेस्ट
- दोन चमचे बारीक जिरे
- चार ते पाच तिखट वेलची
- चार ते पाच गोड वेलची
- एक इंच दालचिनी
- दोन चमचे धने
- दोन ते तीन तेजपत्ता
- चार ते पाच लवंग
- दोन चमचे लाल मिरची पावडर
- अर्धी वाटी तेल
- दोन चमचे साजूक तूप
- पाव वाटी भाजलेले खोबरे
- पाव वाटी कोथिंबीर
- पाव वाटी पुदिना
- पाच ते सहा उभे चिरलेले कांदे
- चवीनुसार मीठ
- एक चमचा हळद
कृती:-
- प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास साधारण दोन ग्लास पाण्यात भिजू घाला.
- चिकन स्वच्छ धुवून हळद मीठ लावून वीस मिनिटे मॅरीनेट करण्यासाठी ठेवा.
- कांदा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
- उकळत्या पाण्यात दोन तिखट वेलची, 2-3 लवंगा, एक तेज पत्ता घाला.
- यातच धुतलेले तांदूळ टाका, यात दोन ते तीन चमचे तेल व चवीप्रमाणे मीठ घाला. हा भात 70% ते 80% शिजवून घ्या. आता एका मिक्सरच्या भांड्यात सर्व खडे मसाले वाटून पावडर तयार करून घ्या.
- आता आणखी एका मिक्सरच्या भांड्यात भाजलेले खोबरे, आले लसूण, थोडी कोथिंबीर, पुदिना व दोन लालसर भाजलेले कांदे घालून पेस्ट तयार करा.
- एका पातेल्यात दोन चमचे तेल घ्या. तेल गरम झाल्यानंतर त्यात तयार केलेली पेस्ट घाला. खडा मसाल्याची पावडर पण घाला व छान परतून घ्या.
- आता मॅरीनेट केलेले चिकनचे तुकडे त्यामध्ये घाला व परतून घ्या.
- आता यात चवीनुसार मीठ, लाल तिखट घाला व आणखी पाच मिनिटे परतून घ्या आता यात एक ग्लास गरम पाणी घाला व चिकन 70% ते 80% शिजवून घ्या.
- आता एक जाडसर पातेले घ्या. पातेले गरम झाले की त्यात एक चमचा तूप घाला व त्यामध्ये 70% ते 80% शिजलेला भात व्यवस्थित पातेल्यात पसरून घ्या.
- त्यावर शिजलेले चिकन चा थर द्या. आता परत भाताचा थर द्या. आता तळलेल्या कांद्याचा थर द्या व पुन्हा चिकनचा थर द्या.
- उरलेला सर्व भात एकदम वर पसरवा. आवडत असेल तर यात खाण्याच्या रंगाचे चार ते पाच थेंब टाका. वरून दोन चमचे साजूक तूप पसरवा. आता हे पातेले घट्ट झाकण लावून पॅक करा. (टीप :-बनवत असताना गॅस एकदम कमी ठेवावा अन्यथा बिर्याणी करपण्याची शक्यता असते)
- दहा ते बारा मिनिटांनी गॅस बंद करा. तीन ते चार मिनिटांनी उघडा.
**********************************************
Tag-chicken dum biryani recipe,chicken dum biryani recipe in marathi,chicken dum biryani near me,chicken dum biryani recipe in hindi,chicken dum biryani at home,recipe of chicken dum biryani
images of chicken dum biryani,preparation of chicken dum biryani,description of chicken dum biryani,chicken dum biryani process,chicken dum biryani chicken dum biryani,chicken dum biryani,cooking time,chicken dum biryani cooker,chicken dum biryani description,chicken dum biryani dum time
COMMENTS