पुदिना चटणी || Pudina Chutney
पुदिना चटणी || Pudina Chutney || Mint Chutney
साहित्य:-
- एक वाटी बारीक चिरलेला पुदिना
- एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
- अर्धी वाटी चार ते पाच तास भिजलेले डाळे
- आठ ते दहा लसूण पाकळ्या
- अर्धा इंच आले
- चार ते पाच हिरव्या मिरच्या
- चार ते पाच कडीपत्त्याची पाने
- अर्धा चमचा जिरे
- एक लिंबाचा रस
कृती:-
- एका मिक्सरच्या भांड्यात पुदिना, कोथिंबीर, आले, लसूण, हिरव्या मिरच्या, भिजलेले डाळे, भाजलेल्या हिरव्या मिरच्या घालून बारीक वाटून घ्या.
- यामध्ये मीठ व साखर घालून आणखी वाटून घ्या.
- आता याच भांड्यात एक लिंबाचा रस घालून आणखी मिक्सर फिरवून घ्या.
- यामध्ये पाणी घालू नये.
आपली पुदिना चटणी तयार
आहे.
(या चटणीला वरून तडका
देण्याची, शिजवण्याची गरज नाही.)
Tag- mint chutney recipe,mint chutney for kebab,mint chutney recipe for sandwich,mint chutney online,the mint chutney,how to prepare a mint chutney,pudina chutney recipe,pudina chutney recipe in marathi,pudina chutney in marathi,pudina chutney for chaat,pudina chutney chutney,best pudina chutney recipe
COMMENTS